कृषी सेवक | ७ नोव्हेंबर २०२२ | ग्रामीण भागातून उत्पादित केलेल्या अंडयांना व कोंबडयांना अधिक चांगल्या दराने मागणी असते. यासाठी आपल्या देशात अधिक प्रतीकार शक्ती असलेल्या व ग्रामीण क्षेत्रामध्ये अधिक टिकाऊपणे राहतील अशा विविध रंगांतील जाती विकसित करून त्यावरती संशोधन चालू आहे. या संशोधनातून निर्माण झालेली एक जात म्हणजे ‘गिरीराज’ ही होय. स्वयंरोजगार निर्मितीसाठी गिरिराज कोंबडीचे पालन हा एक चांगला रोजगार ठरत आहे. या व्यवसायापासून सतत वर्षभर उत्पन्न मिळण्याची संधी निर्माण झालेली आहे.
वैशिष्ट्ये –
गावठी कोंबड्यांप्रमाणे विविध रंगांत आढळतात.
कोणत्याही वातावरणात एकरूप होतात.
रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते.
मांस व अंडी भरपूर प्रमाणात मिळतात. (आठ आठवड्यांत सुमारे एक किलो)
अंडी वर्षाकाठी 160 ते 180 मिळतात.
मांस चविष्ट असते.
74 टक्के मांस मिळते.
या कोंबडीचा वयात येण्याचा कालावधी 166 दिवस
अंड्यांतून सशक्त पिल्ले जन्माला येतात.
सफल अंड्यांचे प्रमाण 87 टक्के.
या कोंबडीला एक किलो वजनासाठी 2.6 किलो खाद्य द्यावे लागते.
व्यवस्थापन –
खाद्य व्यवस्थापनासह सुरवातीपासून ते बाजारपेठेच्या टप्प्यापर्यंत कोंबडीची व्यवस्था चांगली घेतली तर या पक्ष्यांपासून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळू शकतो. गिरिराजची एक दिवसांची पिल्ले वाहतूक करून आपल्याकडे आणल्यानंतर प्रवासामुळे पिल्लांना एक प्रकारचा ताण येतो. तो कमी करण्यासाठी त्यांना इलेक्ट्रॉल पावडरचे द्रावण एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यात द्यावे. दुसऱ्या ते चौथ्या दिवसापर्यंत पाण्यातून प्रतिजैविक (ऍन्टिबायोटिक) द्यावे लागते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून रोगापासून संरक्षण मिळते. पाचव्या ते सहाव्या दिवशी त्यांना बी कॉम्प्लेक्स द्यावे. सातव्या दिवशी लासोटा लस द्यावी. लसीचा ताण येत असल्यामुळे दुसऱ्या दिवशी बी कॉम्प्लेक्स द्यावे. 14-15 व्या दिवशी गंभोरा लस द्यावी. त्याच्या दुसऱ्या दिवशी बी कॉम्प्लेक्स द्यावे. 25-30 दिवसांच्या दरम्यान व 40-50 दिवसांदरम्यान लिव्हर टॉनिक 20 मि.लि. प्रति 100 पक्ष्यांना द्यावे.
खाद्य –
सुरवातीला एक- दोन दिवस भरडलेला मका द्यावा. त्यानंतर चार आठवडे स्टार्टर खाद्य द्यावे. नंतरचे चार आठवडे फिनिशर खाद्य द्यावे. सरासरी एका पक्ष्याला मोठे होईपर्यंत (आठ आठवड्यांचे) 2.6 किलो ग्रॅम खाद्य द्यावे. तसेच आठ आठवड्यांनंतर खाद्य देत राहिल्यास त्याच प्रमाणात त्यांची वाढ होत राहते. खालीलप्रमाणे खाद्य द्यावे.
वरील प्रमाणे खाद्य दिले तर खाद्याचे नुकसान होणार नाही आणि वजन व्यवस्थित येईल.
तापमान –
गिरिराज कोंबड्यांच्या पिल्लांना खालीलप्रमाणे उष्णता किंवा लाइटचा प्रकाश व्यवस्थित दिल्यास त्यांची चांगली वाढ होते. मरतुकीचे प्रमाण कमी राहते व त्याचा परिणाम वाढीवर चांगला होऊ शकतो.
कोंबडीचे घर –
पक्ष्यांना एक दिवसाच्या पिल्लापासून ते दोन महिने म्हणजे बाजार पेठेत नेण्यापर्यंत एक चौरस फूट जागा लागते. तसेच 100 पक्ष्यांना 10 बाय 10 चौ. फू. क्षेत्रफळाची खोली बांधावी लागते. कोंबडीचे घर पूर्व- पश्चिम बांधावे. जागा उंच ओट्यावर असावी. पाण्याची निचरा होणारी जमीन निवडावी. कोंबडीच्या घरात सतत खेळती हवा असावी. घर मुख्य रस्त्यापासून 1 ते 1.50 किलोमीटर अंतरावर असावे. यामुळे कोंबड्यांना ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा त्रास होणार नाही.
गिरिराज कोंबडीचे लसीकरण व औषधी उपचार हे आपल्या भागातील कृषि विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, कृषी विद्यापीठ किंवा पशुवैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानेच करावे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम