जनावरांसाठी खाद्य ठोकळे बनविण्यासाठी यंत्र

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २ डिसेंबर २०२२ I पिकाच्या काढणीनंतर उरलेले अवशेष शक्यतो वाया जातात. भाताचे तूस, भुईमूगाचा पाला, गव्हाचा भूसा उपयोग होत नसल्यामुळे जाळून टाकला जातो. पिकाच्या उरलेल्या अवशेषाचा वापर जर जनावरांसाठी चारा म्हणून केला तर हे घटक वाया न जाता जनावरांसाठी चाराटंचाईच्या काळात चारा म्हणून उपयोगी पडतील.
हा विचार करुन जुनागढ (गुजरात) कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्रक्रिया आणि अन्न अभियांत्रिकी विभागाने जनावरांसाठी खाद्याचे ठोकळे म्हणजेच फीड ब्लॉक बनविण्याचे यंत्र विकसित केले आहे. या यंत्राचा वापर करून गव्हाचा भुसा, भुईमुगाचा पाला किंवा पेंड, उसाची मळी, मीठ व युरियाचा वापर करून ५ किलोचे खाद्याचे ठोकळे बनविता येतात.

यंत्राची वैशिष्ट्ये

यंत्र हस्तचलित असून, एक अश्वशक्तीच्या मोटारीवर चालते.यंत्र एका मजुराकडून चालविता येते.प्रतितासाला ४ ते ५, तर एका दिवसाला ४० असे पाच किलोचे खाद्याचे ठोकळे या यंत्राद्वारे बनविता येतात. या यंत्रामुळे निकृष्ट चारा उपयोगात आणता येतो.
खाद्य ठोकळे जनावरे आवडीने खातात.या यंत्रामुळे चाऱ्याची साठवणक्षमता वाढते. सोबतच चाऱ्याची ने-आण करणेही सोपे जाते.कमी वेळात काम होत असल्यामुळे मजुरीवरील खर्च कमी होतो.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम