कारल्याला चांगला उठाव

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १६ डिसेंबर २०२२ I देशातील बाजारात कारल्याला सध्या चांगला दर मिळतोय. कारल्याला मागणी वाढल्याचं विक्रेते सांगत आहेत.

मात्र मागणीच्या तुलनेत बाजारातील आवक काहीशी मर्यादीत असल्याचंही सांगितलं जातं.

सध्या मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक या बाजार समित्या वगळल्या तर सरासरी आवक ही १० ते २० क्विंटलच्या दरम्यान होते. त्यामुळं सध्या कारल्याला सरासरी २ हजार ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. कारल्याचे दर टिकून राहतील असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम