कृषी सेवक I १६ डिसेंबर २०२२ I शेतकऱ्यांची तूर आता बाजारात दाखल होतेय. मात्र दुसरीकडे आयातही जोमात सुरु आहे.
सध्या म्यानमार आणि सुदान या देशांमधून आयात होणाऱ्या तुरीचे भाव ७ हजार २०० ते ७ हजार ३५० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर मालावी आणि मोझांबिकच्या तुरीला ५ हजार २०० ते ६ हजार ५० रुपये दर मिळतोय.
मात्र हजर बाजारात यापेक्षा कमी दर मिळतोय. दुसरीकडं बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या तुरीला सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. यंदा तुरीचे दर तेजीतच राहतील, असा अंदाज तूर बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम