कृषीसेवक | २७ ऑक्टोबर २०२३
देशभरातील शेतकऱ्यांना नेहमीच संकट काळात केद्र व राज्य सरकार विविध योजनेच्या माध्यमातून मदत करीत असतात. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची मदत देते.
त्याच धर्तीवर राज्य सरकाक देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. त्यामुळं आता दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर आता 12000 रुपये येणार आहेत. म्हणजे प्रत्येकी चार महिन्याला शेतकऱ्यांना आता 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये मिळणार आहेत.
गुरुवारी (27 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. पंतप्राधन नरेंद्र मोदी हे काल शिर्डीच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्त विविध विकास कामांचे उद्घाटन झाले. यानंतर मोदींच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शुभारंभ झाला. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे. काल पंतप्रधानांनी एका क्लिकद्वारे राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 1712.02 कोटी रुपये पाठवून योजनेचा शुभारंभ केला.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम