कृषी सेवक । ३१ डिसेंबर २०२२ । सध्या कडधान्य बाजाराचे लक्ष देशातील हरभरा लागवडीकडे आहे. मागील वर्षभर हरभरा दर दबावात ठेवण्यात सरकारला यश आले. देशातील विक्रमी उत्पादन आणि नंतर नाफेडकडून होणारी विक्री यामुळे बाजारावर सतत दबाव राहिला. शेतकऱ्यांना बाजारात हमीभावापेक्षा ८०० रुपयांपर्यंत कमी दर मिळाला. बाजारात आवकेचा हंगाम नसतानाही सध्या हरभरा दर ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहेत. यावरून हरभरा दरावरील दबाव लक्षात येतो. बाजाराची ही स्थिती पाहून शेतकरी यंदा हरभरा लागवड कमी करतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम