पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना अंतर्गत अनुदान मंजुर

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १० डिसेंबर २०२२ I जिल्हयात पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना सन 2021-22 (अंबियाबहार) अंतर्गत ऐ. आय. सी विमा कंपनी यांच्यामार्फत राबविण्यात आली होती. गुलाबराव पाटील,पालकमंत्री यांचे प्रयत्नांनी जिल्हयातील शेतक-यांकरीता या योजनेमध्ये यापूर्वी केळी पिकाचे कमी तापमान व जादा तापमान या हवामान धोक्यांतर्गत एकूण रक्कम रुपये 354.89 कोटी मंजुर करण्यात आले असून 50.191 शेतक-यांच्या बँक खात्यात कंपनीमार्फत अदा करण्यात आलेले आहेत.

तसेच. पालकमंत्री गुलाबराव पाटील, यांचे अध्यक्षतेखाली पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना (अंबियाबहार) बाबत आढावा बैठक पार पडली.

या बैठकीमधील सुचनेनुसार व शासनाशी केलेल्या पाठपुरावा अन्वये सदर योजनेअंतर्गत केळी पिकाचे वारा या हवामान धोके अंतर्गत रुपये 54.03 कोटी मंजूर करण्यात आलेले असून शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. तसेच या योजनेमध्ये आंबा, मोसंबी, पपई व डाळींब या पिकांचे हवामान धोके नुसार रक्कम रुपये 84.17 लाख मंजूर झाले असून 364 शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविलेले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम