इंदापूर तालुक्यातील ९१ गावांमध्ये पेरूच्या पिकाची लागवड केली जात आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व बाह्यवळण रस्त्यावरील फळ विक्रेत्यांसाठी पेरूची विक्री मुख्य आधार बनली आहे, ज्यामुळे कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
सन २०१९-२० मध्ये ३५६ हेक्टर क्षेत्रावर पेरूचे पीक घेतले जात होते, जे २०२३-२४ मध्ये २,४४९.५ हेक्टरपर्यंत वाढले आहे. तालुक्यातील गोतोंडी, वरकुटे खुर्द, पिटकेश्वर, शेळगाव आणि निमगाव केतकी यांसारख्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पेरूची लागवड होत आहे.
Cotton Seed Issue : शेतकऱ्यांसाठी पर्यायी वाणांचा शोध घेणे गरजेचे
पेरूची बागा आता विशिष्ट पिकांऐवजी स्थिर उत्पन्न देणाऱ्या पिकांसाठी ओळखल्या जात आहेत. समशीतोष्ण हवामानामुळे इंदापूर तालुक्यात पेरूचा उन्हाळी, पावसाळी व हिवाळी हंगाम घेतला जातो, ज्यामुळे पेरूची देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत मागणी वाढली आहे.
शेतकरी शास्त्रीय ज्ञानाचा वापर करून उच्च प्रतीचे पेरू उत्पादन घेत आहेत. योग्य आंतरमशागत, खत, पाणी, कीटकनाशक व बुरशीनाशक व्यवस्थापन केल्यास उत्पादनात अधिक वाढ होऊ शकते.
Crop Loan: वाढत्या उत्पादन खर्चामुळे खरीप पीक कर्जात वाढ; सोयाबीनसाठी कर्ज रक्कम कमी
तालुक्यातील पेरू उत्पादन क्षेत्र:
– २०१९-२०: ३५६ हेक्टर
– २०२०-२१: ४७७ हेक्टर
– २०२१-२२: ८९६ हेक्टर
– २०२२-२३: १०४७ हेक्टर
– २०२३-२४: २४४९.५ हेक्टर
भविष्यात इंदापूर तालुक्यातील शेतकरी अधिक शास्त्रीय दृष्टिकोनातून पेरूचे उत्पादन वाढवतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम