मराठवाड्यात पावसाची शक्यता: ६ जूनपर्यंत काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

बातमी शेअर करा

मराठवाड्यातील काही भागात पुढील काही दिवसांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या राज्यात उन्हाचा तापमान वाढले असून उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. २ जूनपासून नांदेड, लातूर, परभणी, बीड, जालना व धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, ३ ते ६ जून दरम्यान बीड, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या कालावधीत वाऱ्याचा वेग ४० ते ५० किमी प्रतितास राहणार आहे आणि वादळी वाऱ्यासह मेघगर्जना देखील होण्याची शक्यता आहे.

तापमान चढेच

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असली तरी तापमान मात्र चढेच राहणार आहे. ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्रानेही काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे. तसेच, बहुतांश ठिकाणी तापमान ४० अंशांपेक्षा जास्त असल्याची नोंद झाली आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम