दक्षिण भारतात मुसळधार पाऊस

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ११ नोव्हेंबर २०२२ | सध्या देशाच्या काही एकीकडे देशात थंडीचा कडाका वाढतआहे. तर दुसरीकडं दक्षिण भारतातील काही राज्यात पाऊस पडत आहे. हवामानात होत असलेल्या चढ उताराचा चांगलाच परिणाम दिसून येत आहे. तामिळनाडू राज्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. चेन्नईत रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळील दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाबरोबरच काही डोंगराळ भागात बर्फवृष्टी सुद्धा होत आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम