सिंधुदुर्गात आंबा, काजू बागांना अनुकूल वातावरण

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ११ नोव्हेंबर २०२२ | सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढले असून हे वातावरण आंबा, काजू बागांच्या दृष्टीने अनुकूल मानले जात आहे.दरम्यान पाऊस थांबल्यानंतर दहा-बारा दिवसांपूर्वी थंडीला सुरुवात झाली; मात्र थंडी दोनच दिवस पडली आणि त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले होते. काही भागांत पाऊसदेखील पडला; मात्र दोन दिवसांपासून पुन्हा थंडी जाणवू लागली आहे. परंतु, गुरुवारी थंडीत चांगलीच वाढ झाली. आंबा, काजू बागांसाठी थंडी आवश्यक होती. वाढलेली थंडी बागांच्या दृष्टीने अनुकूल मानली जात आहे. थंडीचे प्रमाण कायम राहिल्यास चांगली पालवी येईल, अशी अपेक्षा आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम