देशात गव्हाचा तुटवडा जाणवतोय

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १७ ऑक्टोबर २०२२ |देशात गव्हाचा तुटवडा जाणवत असून सरकारकडील गव्हाचा साठा सहा वर्षांतील निचांकी पातळीवर पोहचला आहे. तर सणामुळे मागणी वाढलेली आहे. त्यामुळं गव्हाच्या दरात पुन्हा सुधारणा होत आहे. . देशात नवा गहू येईपर्यंत सध्या उपलब्ध साठ्यावरच अवलंबून राहावं लागेल. सणांमुळं देशात गव्हाला मागणी वाढलीये. मात्र देशात गव्हाचा पुरवठा मर्यादीत असल्यानं दर सध्या वाढलेले आहेत. दुसरीकडं सणांमुळं गव्हाला मागणी जास्त आहे. त्यामुळं १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबरदरम्यान देशातील बाजारात गहू दर २५ ते ७५ रुपयांनी सुधारले आहेत.

सध्या गव्हाला २ हजार ३०० ते ३ हजार ३०० रुपयांपर्यंत दर मिळतोय. ऐन सणांच्या काळात दर वाढल्यानं ग्राहकांची आर्थिक कोंडी होतेय. मात्र या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांनाही मिळत नाही. कारण बहुतेक शेतकऱ्यांनी गहू विकलेला आहे. त्यामुळं या दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांनाच मिळतोय, असंच म्हणावं लागेल.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम