IMD Weather Update : पूर्व विदर्भातील ४ जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा इशारा, ५ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा अलर्ट

बातमी शेअर करा

पूर्व विदर्भातील ४ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच ५ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता असून तापमान पुढील पाच दिवसांत २ ते ३ अंशांनी कमी होण्याचा अंदाज आहे.

चक्राकार वाऱ्यांची स्थिती सध्या केरळ आणि लगतच्या परिसरात सक्रीय आहे आणि समुद्रसपाटीपासून ५.८ किमी अंतरावर आहे.

Soybean Sowing: यंदा सोयाबीन पेरावे का? बियाण्याच्या किंमती वाढल्या

नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.

धुळे, जळगाव, अकोला, आणि अमरावती जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अकोल्यामध्ये पुढील दोन दिवस उष्णतेची लाट राहणार असून त्यानंतर तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता आहे.

Soybean Sowing: यंदा सोयाबीन पेरावे का? बियाण्याच्या किंमती वाढल्या

बंगालच्या उपसागरातील पूर्व मध्यवर्ती भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मुंबईत ८ ते ९ जून रोजी मान्सून सुरू होण्याची शक्यता आहे, तसेच ५ ते ६ जूनच्या आसपास मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम