तूर बाजार: तूरीचा भाव स्थिर! आज राज्यात ६ हजार ४२४ क्विंटलची आवक, मिळतोय असा भाव…

बातमी शेअर करा

सध्या राज्यातील तूरीची आवक कमी झाली असून, बहुतांश बाजारसमित्यांमध्ये तूरीला क्विंटलमागे १० ते १२ हजार रुपये भाव मिळत आहे. मागील पंधरा दिवसांपासून तूरीचा भाव स्थिर आहे. आज राज्यात ६४२४ क्विंटल तूरीची आवक झाली असून, यावेळी मिळणारा भाव ७००० ते १३ हजार रुपयांच्या दरम्यान होता.

Soybean Sowing: यंदा सोयाबीन पेरावे का? बियाण्याच्या किंमती वाढल्या

लाल तूरी आणि पांढऱ्या तूरीची आवक होत असून, लातूरमध्ये लाल तूरीला सर्वाधिक १२ हजार रुपये भाव मिळाला. अमरावती बाजारसमितीत आज सर्वाधिक २५५९ क्विंटल तूरीची आवक झाली असून, तिथला सर्वसाधारण भाव ११ हजार ८१२ रुपये होता. वाशिममध्ये ६०० क्विंटल तूरीची आवक झाली असून, तिथे क्विंटलमागे ११८०० रुपये भाव मिळाला.

कुठल्या बाजारसमितीत तूरीला काय भाव मिळतोय?

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम