गेल्या वर्षी पावसाच्या कमतरतेमुळे सोयाबीन उत्पादनात घट झाली आहे. सध्या सोयाबीनचा दर ४५०० रुपये प्रति क्विंटल आहे, तर ३० किलो बियाण्याच्या पिशवीसाठी ३२०० रुपये मोजावे लागत आहेत.
उत्पादन खर्च वाढलेला, दर कमी मिळत असल्याने, आणि बियाण्याच्या महागाईमुळे सोयाबीन शेती करावी का नको, असा विचार शेतकरी करत आहेत.
पिक विमा योजना २०२३-२४: शेतकऱ्यांना कमी व अधिक तापमान नुकसानीसाठी दुहेरी लाभ – खासदार रक्षाताई खडसे
जिरायती क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. सोयाबीन काढणीनंतर शेतकरी रब्बीच्या शाळू पिकाची पेरणी करतात. दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला चांगला दर मिळाला होता आणि उत्पादनही चांगले झाले होते.
परंतु, गतवर्षी पावसाचा खंड पडल्याने कऱ्हाड तालुक्यात पेरणीचे क्षेत्र वाढले, परंतु उत्पादन घटले. वर्षभरात दर ४२०० ते ४५०० रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहिले, ज्यामुळे सोयाबीनची शेती तोट्यात गेली.
शासनाने पावसाचा खंड पडलेल्या भागात कृषी अधिकारी आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती, पण नुकसानभरपाई मिळाल्याची माहिती नाही.
शेतीचा मेहनत खर्च, खत, बियाणे आणि मजूरांच्या दरात वाढ झाली आहे. ३० किलो सोयाबीन बियाण्याचा दर ३२०० रुपये आहे, म्हणजे प्रति किलो १२० रुपये, तर विक्री दर ४५ रुपये आहे.
दर वाढतील या अपेक्षेवर २० टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली नाही. त्यामुळे सोयाबीन शेती करावी की दुसरा पर्याय निवडावा, याबद्दल शेतकरी असमंजसात आहेत.
सोयाबीन पिकाला साधारण पाऊस आवश्यक आहे. काढणीच्या वेळी पाऊस आल्यास मोठे नुकसान होते. दराची हमी नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. गतवर्षीच्या शिल्लक सोयाबीनचा परिणाम नवीन सोयाबीनच्या दरावर होत आहे.
सोयाबीन पिकाला शासनाने हमीभाव दिला तरच शेतकऱ्यांना फायदा होईल अन्यथा शेतकरी उद्ध्वस्त होतील. – शिवाजी पाटील, जिल्हाध्यक्ष, रयत क्रांती शेतकरी संघटना.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम