शेतकऱ्यांचा पारंपरिक मित्र गांडूळ

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १४ डिसेंबर २०२२ I गांडूळांचा आणि जंगलांचापण घनिष्ट संबंध असतो. शेत नांगरण्याच काम माणुस करतो पण जंगल नांगरण्याच काम ही गांडूळ करतात. तर असं हे परोपकारी गांडूळ शेतकऱ्यांचा मित्रआहे.

1) पहिलं गांडूळ म्हणजे जमिनीच्या वरच्या थरावर रहाणारं एपिजीअल [ पेरिओनिक्स एक्सकॅव्हॅट्स ] गांडूळ. हे गांडूळ फ़क्त जमिनीच्या प्रुष्ठभागावरचे सेंद्रिय पदार्थ खाउन टाकतं.ओला कचरा साफ़ करताना आपल्याला नेहेमी दिसतात.हे गांडूळ रंगाने जांभळट लाल असतं नी जर बोटाने दाबुन पाहिलं तर स्लाईटली खरखरीत लागतं.

ह्याच्या शरीराची दोन्ही टोकं आधी करपट काळसर रंगाची असतात आणि शरीर एकदम स्लीक म्हणजे सडसडीत नी साधारण ८ ते १० सेमी लहान असतं.हे गांडूळ इतर गांडूळापेक्षा चपळ तर असतच पण त्याची प्रजनन शक्तीपण भरमसाठ असते. म्हणुनच याला गांडूळखतासाठी उपयुक्त समजलं जातं. ’

2) मातीच्या वरवरच्या थरात रहणारं ’अनसेनिक’ हे दुसऱ्या प्रकारचं गांडूळ’[ लॅपिटो मॉरेटी] खोदकाम करताना आपल्याला अनेकदा दिसतं. या गांडूळाला टाकाऊ पदार्थ आणि ओला हिरवा कचरा म्हणजेच पानांच कचरा खायला लागतो. अनसेनिक गांडूळाचं अंग चांगलं चकचकीत तर असतच पण हे लठ्ठही असतात. त्याला स्पर्श केला तर हे रबरासारखं लागतं. राखाडी पांढरट असलेलं हे गांडूळ पहिल्यापेक्षा जास्त लांब असतं. साधारण १५ ते १६ सेमी लांब होणारं अनसेनिक गांडूळसुद्धा गांडूळ खत प्रकल्पात वापरलं जातं.

3) तिसरा प्रकार म्हणजे ’एण्डोजेइक गांडूळं’ जी मातीच्या आत आत खुप खोल रहातात. ही आपल्या नजरेस जास्त पडत नाहीत कारण ह्यांचा आपल्याशी जास्त पाहिला पडत नाहीत.

गांडूळाची शरीर रचना –

गांडूळाचं शरीर जास्तीतजास्त ओलसर असतं कारण ते त्वचेमार्फ़त श्वसन करतं. याचसाठी त्यांची त्वचा अजिबात कोरडी पडून चालत नाही. म्हणजे जर त्वचा कोरडी झाली किंवा तिच्यातला चिकट्पणा कमी झाला तर गांडूळ मरुन जातं. उदाहरण द्यायच झालं तर , कुठल्याही गांडूळाला टिप कागदावर ठेवलं तर ते लगेच मरुन जातं कारण त्याची त्वचा कोरडी होते नी त्वचेतला ऑक्सिजन संपला की काम खतम ! गांडूळांना खारट पाणी पण सोसत नाही.

याच कारण अनेकांना माहीतच नसतं . गांडूळ पाण्यात जास्त दिवस राहू शकत नाही कारण त्यांची जी विष्ठा असते ना, त्यातून अमोनिया बाहेर पडत असतो नी हा पाण्यात जमला की पाणी विषारी होऊन गांडूळ मरुन जातं.

गांडूळाचे प्रजनन-

निसर्गात ही गांडूळ मोठ्या संख्येने आढळते. बहुतांश लोकांना माहीतच नसत की गांडूळाला पिल्लं कशी होतात? या अज्ञानामागची गम्मत म्हणजे गांडूळ उभयलिंगी आहे. म्हणजे तो नाही की ती नाही ! ज्याला इंग्रजीत hermaphrodite म्हणतात.हर्माफ्रोडाइट असणे म्हणजे हिजडेपण किंवा दर्जाहीन भाषेत छक्का असणे नव्हे तर एकाच शरीरात दोन्ही लिंगांची पूर्तता असणे.

असा जीव जो स्वतःच स्वतःची संतती निर्माण करू शकतो. गांडूळ किडा मुंग्या काय अभ्यासायच्या ? असा तुच्छ विचार केल्यास निसर्गातल्या अशा महत्वाच्या माहितीपासून आपण वंचित रहातो . तर असं हे हर्माफ्रोडाईट- पौरुषसंपन्न आणि स्त्रीत्वसंपन्न गुणांनी संपन्न असलेल पुर्ण वाढ झालेलं गांडूळ मिलनानंतर त्याच्या कातडीचा जास्त वाढलेला भाग म्हणजे ’क्लिटेलम’ टाकुन देतात नी त्याचा कोष बनवतात. हा कोष दोन आठवड्यानी उबून त्यातून लहान गांडूळं बाहेरयेतात.

प्रत्येक कोषातून साधारण ३ पिल्लं जन्मतात.ही पिल्लं पुर्ण वाढ होण्यासाठी म्हणजेच पुनरुत्पादनासाठी साधारण १५ ते १८ दिवस लागतात. यांच आयुष्य अवघं सहा ते बारा महिने एवढच असल्याने त्यांची संख्या पटापटा वाढण्यासाठी निसर्गाने केलेली किमया आहे. गांडूळांना शत्रु फ़ार ! बेडुक, साप, पक्षी, सरडे, चिचुन्दरी आणि हल्ली माणुसदेखील यांना खातो. ह्या सगळ्यामुळे गरीबाला स्वसंरक्षण म्हणजे लपुन बसणे. रात्रीच्या कमी वर्दळीच्या जमिनीतुन ही कंपनी बाहेर येते.

गांडूळाचे उपयोग-

ज्या जमिनीत गांडूळ नाही ती जमिन अगदी मृतच म्हणायला हवी. शेताची नांगरणी करुन शेत लावल्यावर तरारलेल्या पिकाला पुन्हा नांगरता येत नाही. मग अशा वेळेस मुळांना हवा खेळती ठेवण्याचं काम हे आपले गरीब मित्र करतात.
गांडूळ मातीत खाली खाली जातं . ह्याने मातीत छिद्रे होवुन माती सच्छिद्र होते, हवा खेळती राहुन मातीतला पाण्याचा माव वाढतो. गांडूळाने माती खाऊन पचवलेला पाचोळा, माती पचून विष्ठेतून बाहेर पडतो नी हेच बनत गांडूळ खत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम