कृषी सेवक । १ जानेवारी २०२३ । देशातील बाजारात मागील दोन दिवसांपासून कापसाच्या दरात सुधारणा होत आहे. अनेक बाजारात कापसाचा सरासरी दर आता ८ हजारांपर्यंत पोचला.
मात्र अद्यापही बाजारातील कापूस आवक अपेक्षेपेक्षा कमीच असल्याचं व्यापारी सांगत आहेत. आज कापसाला सरासरी ७ हजार ६०० ते ८ हजार ९०० रुपये दर मिळाला. कापसाचे दर सुधारण्यास पोषक स्थिती असल्याने जानेवारीत कापूस दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम