आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेजीत

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ३१ डिसेंबर २०२२ । आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरातील तेजी कायम आहे. आज सोयाबीनचे दर जवळपास एक टक्क्याने वाढून प्रति बुशेल्स १५.३४ डाॅलरवर पोचले होते. खाद्यतेलाचे वाढते दर आणि सोयापेंडमध्ये आलेली तेजी यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर वाढलेत, असं जाणकारांनी सांगितलंय. असं असलं तरी देशांतर्गत बाजारपेठेत मात्र सोयाबीनचे दर आजही काहीसे स्थिर होते. देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपये क्विंटल दर मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेजीत असल्यानं देशातही सोयाबीनचे दर वाढतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम