कृषी सेवक | १० नोव्हेंबर २०२२ | नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्याच्या मौजे बारूळ गावातील उच्चशिक्षित असलेल्या शिवकांत इंगळे या तरुणाने केला आहे. या तरुणाने तीन लाखांचे उत्पादन फक्त वीस गुंठे मध्ये लावलेल्या स्पाईसी मिरचीच्या पिकाद्वारे घेऊन एक नवीन विक्रमच प्रस्थापित केला आहे. या शेतकऱ्याने चांगला भाव मिळणाऱ्या स्पायसी मिरचीचे वीस गुंठ्यात लागवड केली. यासाठी मल्चिंग पेपर व ठिबकसिंचन संचचा वापर करून मिरचीची लागवड बेडवर केलेली आहे. आज मीतीपर्यंत या तरुणाने या पिकांमधून तब्बल अडीच लाख रुपये मिळविले .
विशेष म्हणजे हा तरुण एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीवर होता. मात्र गावाकडे येऊन शेती करण्याचा ओढा असल्याने नोकरीला रामराम ठोकून त्याने शेतीचा मार्ग पत्करला. सेंद्रिय शेती, मल्चिंग तंत्रज्ञान व ठिबक संच प्रणाली इत्यादी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या शेतकऱ्यांनी मिरची पिकाच्या क्षेत्रात भरघोस उत्पादन मिळवत इतर शेतकऱ्यांसमोर तसेच उच्च शिक्षित तरुणांसमोर देखील एक आदर्श निर्माण केला आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम