कृषी सेवक | १० नोव्हेंबर २०२२ | देशात सध्या सोयाबीनच्या दर वाढलेले आहेत. मात्र तरीही बाजारात आवक नाही. तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारातही सोयाबीन दर सुधारलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनाि सोयाबीन दरात आणखी वाढ होणयाची आशा आहे. सध्या देशातील बाजारात सोयाबीन सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ८०० रुपये दर मिळत आहे. यंदा ब्राझील आणि अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन वाढेल. मात्र या दोन्ही देशांमध्ये यंदा ला निना स्थितीचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळं उत्पादनाचे अंदाज चुकण्याची दाट शक्यता आहे. या दोन्ही देशांमध्ये सोयाबीनची पेरणी सुरु आहे. तर अमेरिका आणि भारतातील सोयाबीनचा हंगाम सुरु झाला. युएसडीनं अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन यंदा गेल्यावर्षीपेक्षा ३३ लाख टनांनी कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मागील हंगामात अमेरिकेत १ हजार २१५ लाख टन सोयाबीन उत्पादन झालं होतं. तर यंदा १ हजार १८२ लाख टनांवर उत्पादन स्थिरावण्याची शक्यता आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम