आल्याला सरासरी ३ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ११ नोव्हेंबर २०२२ |राज्यातील बाजारात सध्या आल्याची आवक वाढत आहे. आवक सरासरीच्या तुलनेत कमीच दिसत असली तरी दर दबावात आहेत. सध्या राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर आणि सातारा बाजार समित्यांमध्ये आल्याची आवक जास्त आहे. मात्र इतर बाजारांमधील आवक तुलनेत कमीच आहे. सध्या आल्याला सरासरी ३ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत असून आल्याला कमी दर असल्यानं शेतकरी मात्र अडचणीत आले आहेत. आल्याच्या दरात लगेच सुधारणा होण्याचा अंदाज नसल्याचं बाजारातील जाणकारांनी सांगितले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम