कृषी सेवक I ६ डिसेंबर २०२२ I कळमना बाजार समितीत वाळलेल्या मिरचीनंतर आता ढोबळी मिरची दरातही तेजी अनुभवी जात आहे. ढोबळ्या मिरचीचे दर (Capsicum Market Rate) गेल्या आठवड्यात १५०० ते १७०० याप्रमाणे होते. ३०० क्विंटलची आवक नोंदविली गेली. आता मात्र आवक कमी झाल्याने दरात तेजी अनुभवली जात आहे. २५०० ते ३००० रुपये क्विंटलवर या मिरचीचे दर पोहोचल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.कळमना बाजार समितीत मिरची दर चांगलेच तेजीत आले आहेत. १२००० ते २०००० रुपये प्रमाणे वाळलेल्या मिरचीचे व्यवहार होत आहेत. गेल्या आठवड्यात वाळलेल्या मिरचीची आवक ३३३ क्विंटल होती. या आठवड्यात ही आवक दुपटीने वाढत ६१४ क्विंटलवर पोहोचल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यानंतरही वाळलेल्या मिरचीचे दर स्थिर आहेत. ढोबळी मिरची गेल्या आठवड्यात १५०० ते १७०० अशी होती. या आठवड्यात २५०० ते ३००० रुपयांनी ढोबळ्या मिरचीचे व्यवहार होत आहेत. आवक कमी झाल्याच्या परिणामी मिरचीच्या दरात तेजी अनुभवी जात असल्याचे सांगण्यात आले. हिरव्या मिरचीची आवक गेल्या आठवड्यात ३०० क्विंटल होती. १५०० ते १८०० असा दर होता. या आठवड्यात आवक २६० क्विंटलवर पोहोचली. १५०० ते २००० रुपयांनी हिरव्या मिरचीचे व्यवहार होत आहेत. बाजारात कोथिंबीरची आवक गेल्या आठवड्यात ३५० क्विंटल अशी होती. २००० ते ४००० रुपये असा दर होता.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम