कारल्याला बाजारात वाढली मागणी ; मिळतोय हा दर

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ११ नोव्हेंबर २०२२ |राज्यात सध्या कारल्याला चांगला दर मिळतोय. कारल्याची आवक अद्यापही मर्यादीत दिसतेय. राज्यातील मोठ्या बाजार समित्या वगळता कारल्याची आवक सरासरी १० क्विंटलपेक्षा जास्त नाही. मात्र कारल्याला मागणी टिकून आहे. याचा परिणाम कारल्याच्या दरावर होताना दिसतोय. सध्या कारल्याला प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ३ हजार ३०० रुपये सरासरी दर मिळतोय. कारल्याची बाजारतील आवक कमी असल्यानं दर तेजीतच राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारतील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम