बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक वाढली

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १५ नोव्हेंबर २०२२ | देशातील बाजारात मुगाची आवक सध्या काहीशी वाढली आहे. राजस्थान हे देशातील महत्वाचं मूग उत्पादक राज्य आहे. मात्र पोत्यांच्या टंचाईने येथील सरकरी खरेदी थांबली होती. त्यामुळं बाजारात मुगाचे दर ६ हजार ५०० रुपयांपर्यंत कमी झाले होते. मात्र या दरात मुगाला मागणी वाढल्याने दर पुन्हा ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान पोचले. केंद्रानं यंदा मुगासाठी ७ हजार ७५५ रुपये हमीभाव जाहीर केला. त्यामुळं मुगाचे दर हमीभावापेक्षा जास्तच राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम