तुरीला मिळतोय ७ ते ८ हजारांचा भाव

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १५ नोव्हेंबर २०२२ | देशात ऑक्टोबर महिन्यात ९५ हजार टन तुरीची आयात झाली. यापैकी तब्बल ८५ टक्के तूर आफ्रिकेतील मोझांबिक, सुदान, मालावी आणि टंझानिया या देशांमधून झाली. तर १४.५ टक्के आयात म्यानमारमधून झाली. सध्या देशातील बाजारात तुरीला ७ हजार ते ८ हजार रुपये दर मिळतोय. पुढील काळातही तुरीच्या दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज असल्यानं सरकारने तूर आयात वाढविण्याचा निर्णय घेतला. मात्र तरीही तुरीच्या दरातील तेजी कायम राहील, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम