कृषी सेवक । १ जानेवारी २०२३ । राज्यातील गुऱ्हाळे सुरु होऊन आता एक महिन्याचा कालावधी उलटला. त्यामुळं बाजारातील गुळाची आवकही वाढली. इतर राज्यांमधूनही गुळाची आवक होतेय. त्यामुळं बाजारावर काहीसा दबाव आल्याचं जाणवतं.
सध्या गुळाला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ३ हजार ४०० रुपयांचा दर मिळतोय. पुढील काळात गुळाची आवक चांगली राहू शकते. त्यामुळं दरावरही काहीसा दबाव येऊ शकतो, असा अंदाज गूळ बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम