देशाला खाद्यतेल आयातीतून गरज भागवावी लागणार

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ५ नोव्हेंबर २०२२ | देशात मागील वर्षात १४० लाख टन खाद्यतेलाची आयात झाली. मात्र यंदा आयात १३५ लाख टनांच्या दरम्यान राहील. तर २०२५-२६ मध्ये देशाची खाद्यतेलाची गरज २७० लाख टनांपर्यंत पोहचू शकते. मात्र देशातील खाद्यतेल उत्पादन १४० लाख टनांपर्यंत वाढेल. म्हणजेच देशाला निम्मी गरज आयातीतून पूर्ण करावी लागेल, असा अंदाज साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक भारत मेहता यांनी व्यक्त केला. ते इंडोनेशिया पाम ऑईल काॅन्फरन्समध्ये बोलत होते. मेहता पुढे म्हणाले की, आता परिस्थिती पुर्वपदावर येत आहे. पुढील पाच वर्षात देशातील खाद्यतेल वापर वाढीचा वेग सरासरी २ ते ३ टक्क्यांच्या दरम्यान राहील. ही वाढ लक्षात घेतल्यास २०२५-२६ मध्ये देशाला वार्षीक २५५ ते २७० लाख टन खाद्यतेलाची गरज भासेल. मात्र देशातील तेलबिया उत्पादन ३८० ते ४०० लाख टनांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. तर देशातील खाद्यतेलाचं उत्पादन या काळात ३० लाख टनांनी वाढून १३५ ते १४० लाख टनांपर्यंत पोचेल. म्हणजेच देशात केवळ मागणीच्या तुलनेत निम्मेच खाद्यतेल उत्पादन होईल. उर्वरित खाद्यतेल देशाला आयात करावे लागेल.

paid add
बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम