पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २१ नोव्हेंबर २०२२ | उत्तम पीक येण्याकरीता उत्तम आणि निरोगी रोपे असणे आवश्यक आहे. याच बाबीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना सुरू केली आहे.चला तर सविस्तर जाणून घेऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना…

 

या योजनेचे उद्देश्य –

राज्यात भाजीपाला उत्पादन वाढ करणे.
भाजीपाला पिकांसाठी निरोगी आणि उत्तम रोपे तयार करणे.
ग्रामीण भागात व्यवसाय संधी निर्माण करणे.

विशेष बाबी –

प्रत्येक तालुक्यात १ रोपवाटीका मिळेल.
राज्यभरात ५०० लाभार्थींना याचा लाभ मिळेल. ( वरील बाबीमध्ये बदल होऊ शकतो.)

कोणकोणत्या पिकाची रोपे तयार करता येतील ?

टोमॅटो
वांगी
कोबी
मिरची
फुलकोबी इत्यादी.

लाभार्थी निवड कशी होईल ?

महिला कृषी पदवीधरांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
महिला शेतकरी गट किंवा महिला शेतकरी उत्पादक कंपनी यांना व्दितीय प्राधान्य मिळेल.
अल्प किंवा अत्यल्प भूधारक शेतकरी यांना तृतीय प्राधान्य देण्यात येईल.

अनुदान किती व कसे मिळेल ?

सदरील योजनेअंतर्गत ५० % अनुदान मिळणार आहे.
हे अनुदान डी बी टी नुसार थेट लाभार्थी व्यक्तीच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.

paid add

अत्यंत महत्त्वाचे –

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना ही फक्त नवीन तयार होणाऱ्या रोपवाटीकाना लागू आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे –

आधार कार्ड
बँक पासबुक
७/१२
८ अ उतारा
स्थळ नकाशा आणि चतु:सीमा
कृषी पदवीधरांना पदवी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक.
शेतकरी गट आणि एफ पी ओ यांना नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक.
हमी पत्र

योजनेचा लाभ घेण्याकरिता कोठे अर्ज करावा ?

ऑनलाईन पद्धतीने महा डी बी टी पोर्टल येथे अर्ज करावा.
याकरिता आपल्या गावातील सी एस सी सेंटर येथे संपर्क साधावा.
ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याकरिता आपल्या तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यालय येथे भेट द्यावी.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना अनुदान प्रक्रिया –
खालील गोष्टीवर अनुदान मिळेल.

शेडनेट
प्लॅस्टिक टनेल
पॉवर स्प्रेअर
प्लॅस्टिक क्रेट

वरील चार घटक एकाच ठिकाणी उभारणे बंधनकारक.
पाणी पुरवठा, वीज जोडणी इत्यादी खर्च स्वतः लाभार्थी व्यक्तीने करावयाचा आहे.
संपूर्ण अनुदान रक्कमेपैकी ६०% अनुदान रोपवाटिकेची पूर्ण उभारणी झाल्यावर देण्यात येईल.
उर्वरित ४०% अनुदान रोपे तयार झाल्यावर अदा करण्यात येईल.
कृषी अधिकारी जागेचा प्राथमिक सर्व्हे करतील.
रोपवाटीका उभारणी करण्याकरिता विकत घेतलेले मटेरियल याची सुद्धा तपासणी करतील.
नर्सरी तयार झाल्यावर अंतिम तपासणी करून अनुदान देण्यात येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क –

तालुका कृषी अधिकारी कार्यालय
आपल्या गावातील कृषी सहायक यांचे कार्यालय
कृषी विभागाची अधिकृत वेबसाईटwww.krishi.maharashtra.gov.in याठिकाणी भेट द्यावी.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम