कृषी सेवक | २८ ऑक्टोबर २०२२ | राज्यात लम्पी स्कीन आजार नियंत्रणात आला असून ३२ जिल्ह्यांतील २ हजार ८६९ गावांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण १ लाख २२ हजार ७१५ बाधित पशुधनापैकी एकूण ७८ हजार ३४१ पशुधन उपचाराने बरे झाले आहे. एकूण १ कोटी ४ लाख ९७ हजार लसी देण्यात आल्या आहेत.
त्यामधून एकूण १ कोटी ३३ लाख ९२ हजार पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. जळगाव, नगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, कोल्हापूर, सांगली, वाशीम, जालना, हिंगोली आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेल्या लसीकरणामध्ये सुमारे ९५.७१ टक्के गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम