मध केंद्र योजना

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २१ नोव्हेंबर २०२२ | मध हा नैसर्गिक बहुउपयोगी घटक आहे. आज आपण पाहणार आहोत मध केंद्र योजना काय आहे याबद्दल…
काय आहे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची मध केंद्र योजना ?

 

योजनेची व्याप्ती –

सदर योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू आहे.
योजना अंमलबजावणी करिता जिल्हाधिकारी कार्यालयात समिती स्थापन केली आहे.

योजनेचे लाभ काय असतील ?

५० % साहित्य स्वरूपात अनुदान
मोफत मध उद्योग शासकीय प्रशिक्षण

विशेष बाब –

शासकीय प्रशिक्षण अगदी मोफत मिळणार आहे.
सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार निर्माण होईल.
ग्रामीण भागात अर्थकारण संधी मिळेल.

योजनेचा लाभ कशा घ्यायचा ?

वरील योजनेत वेगवेगळ्या वर्गवारी मध्ये सहभाग घेता येणार आहे.

१. वैयक्तिक मधपाळ

२. केंद्र चालक प्रगतिशील मधपाळ

३. केंद्र चालक संस्था

४. विशेष छंद प्रशिक्षण

५. आग्या मध संकलन प्रशिक्षण
वैयक्तिक मधपाळयाकरिता

लाभार्थी साक्षर आणि १८ वर्ष वयापेक्षा जास्त असणे आवश्यक.
त्यास २४ हजार रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
२४ हजार रुपयांची साहित्य आणि साधने मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी १० दिवसांचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक

केंद्र चालक प्रगतिशील मधपाळया घटकाकरिता

लाभार्थी २१ वर्ष पूर्ण आणि किमान १० पास असणे गरजेचे आहे.
लाभार्थीच्या नावे किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे किमान १ एकर जमीन असणे आवश्यक आहे.
स्वतः ची १ एकर जमीन नसेल तर भाडे तत्वावर घेतलीली चालेल.
विशेष आणि महत्त्वपूर्ण बाब म्हणजे लाभार्थीकडे मधमाशा पालन प्रशिक्षण, मधमाशा प्रजनन सुविधा असणे गरजेचे आहे.

केंद्र चालक संस्थायाकरिता

ही संस्था कायद्याने नोंदणीकृत असावी.
मधमाशा पालन प्रशिक्षण, मधमाशा प्रजनन सुविधा असणे गरजेचे आहे.
संस्थेकडे स्वतः ची किंवा भाड्याने घेतलेली १००० चौरस फूट इमारत आणि १ एकर जमीन पाहिजे.

विशेष छंद प्रशिक्षणयाकरिता

२५ रुपये फी आकारण्यात येईल.
अर्ज करण्याकरिता सर्वजण पात्र आहेत.
५ दिवस शासकीय प्रशिक्षण देण्यात येईल.

आग्या मध संकलन प्रशिक्षण

१८ ते ५० वयोगटातील आणि साक्षर व्यक्ती यासाठी पात्र.
५ दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येईल.

महत्वाचे –

लाभार्थींना प्रशिक्षण कुठे द्यायचे हे सर्व अधिकार मंडळाकडे असतील.
प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी मध केंद्र सुरू करणार आहे अशा एक बॉण्ड मंडळाला द्यावा लागेल.

अधिक माहितीसाठी संपर्क –

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, महाबळेश्वर, जि. सातारा
प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी कार्यालय

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम