ऑनलाईन शेतमाल तारण कर्ज योजना

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २२ नोव्हेंबर २०२२ | आपण महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाईन शेतमाल तारण कर्ज योजनेबद्दल माहिती बघणार आहोत. काय आहे ऑनलाईन शेतमाल तारण कर्ज योजना.

पिक काढणी झाल्यावर लगेच शेतमाल मार्केट मध्ये विक्री करिता आणला जातो. मात्र मोठ्या प्रमाणात आवक असल्याने शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. हाच शेतमाल योग्य नियोजन करून साठवून थोड्या काळाने मार्केट मध्ये आणल्यास शेतमालाला रास्त भाव मिळतो.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ली. यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शेतकरी बांधवांसाठी वखार महामंडळाच्या पावतीवरील शेतमालाला ऑनलाईन तारण कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे.
लाभार्थी – फक्त शेतकरी बांधव

आवश्यक कागदपत्रे –

शेतकरी बांधवांचे आधारकार्ड
शेतकरी बांधवांच्या नावावरील सातबारा
बँक वचन चिठ्ठी
सभासदत्व अर्ज
पॅन कार्ड ( ऑप्शनल )

योजनेची विशेष बाब –

संबंधित शेतकरी बांधवाला वखार महामंडळाच्या गोदामतच ऑनलाईन तारण कर्ज मिळणार.
कर्जाची रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार.
कर्ज मिळविण्यासाठी कोणत्याही बँकेत जाण्याची गरज नाही.

योजनेबद्दल –

शेतमाल तारण कर्ज ९ % व्याजदराने मिळणार आहे.
साठवणूक केलेल्या मालाच्या किंमतीच्या ७० % पर्यंत कर्ज मिळणार आहे.
हे कर्ज महाराष्ट्र राज्य सहकारी बँक उपलब्ध करून देणार आहे.
पिकपेरा प्रमाणपत्र आधारे वखार महामंडळाच्या भाड्यात ५० % सवलत सुद्धा मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात शेतमाल सुरक्षित आणि योग्य पद्धतीने साठविला जाणार आहे.
साठविलेल्या शेतमालावर विमा संरक्षण देखील लागू आहे.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ वेबसाईट  www.mswarehousing.com

या योजनेच्या अधिक माहितीसाठी आणि लाभ मिळविण्यासाठी आपल्या जवळील वखार महामंडळाच्या गोदामाला भेट द्यावी.
वखार महामंडळाच्या अधिकारी यांना भेटून या शेतमाल तारण कर्ज योजनेचा सर्व शेतकरी बांधवानी लाभ घ्यावा.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम