महाराष्ट्र हवामान अपडेट: महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा यलो अलर्ट

बातमी शेअर करा

महाराष्ट्रातील पुण्यासह १५ जिल्ह्यांना हवामान विभागाने मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. कोकणातील दोन जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यात पूर्वमोसमी पावसाची सुरुवात झाली आहे.

अरबी समुद्राच्या मध्य भागात नैऋत्य मोसमी पावसाची प्रगती चालू असून, पुढील आठवड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची सक्रीय स्थिती असल्याचे हवामान विभागाने नोंदवले आहे.

शेतकरी कर्ज: नाबार्डकडून पीक कर्ज मर्यादेत वाढ, वाचा कोणत्या पिकाला किती कर्ज?

पालघर आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमीपर्यंत राहू शकतो.

आज यलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांची यादी:
– अहमदनगर
– पुणे
– कोल्हापूर
– सातारा
– सांगली
– सोलापूर
– बीड
– नांदेड
– लातूर
– धाराशिव
– भंडारा
– गोंदिया
– नागपूर
– वर्धा

पुढील पाच दिवसांमध्ये राज्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी लागणार असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, आणि कोकणातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम