कांदा बाजार भाव : ४ जून २०२४ रोजीच्या ताज्या दरांची माहिती

बातमी शेअर करा

आज ४ जून २०२४ रोजीच्या बाजार भावानुसार, राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची ९७ हजार क्विंटल आवक झाली. यात कांद्याला १४०० ते २१०० रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. सर्वसाधारण कांद्याला १५०० ते २२५० रुपयांपर्यंत दर मिळाला. सर्वाधिक दर सातारा बाजार समितीत नोंदला गेला.

लाल कांद्याला सरासरी १६०० ते २००० रुपयांपर्यंत दर मिळाला. सोलापूर बाजार समितीत १६०० रुपये, धुळे बाजार समितीत १८१० रुपये, साक्री बाजार समितीत १८५० रुपये, तर हिंगणा बाजार समितीत २००० रुपयांचा दर मिळाला. उन्हाळ कांद्याला सरासरी १४०० ते २१०० रुपयांपर्यंत दर मिळाला. येवला अंदरसुल बाजार समितीत १७०० रुपये, लासलगाव विंचूर बाजार समितीत २१५० रुपये, सिन्नर बाजार समितीत २०५० रुपये, मनमाड बाजार समितीत १७५० रुपये, सटाणा बाजार समितीत १९५० रुपयांचा दर मिळाला.

आजचे सविस्तर बाजार भाव

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम