महाराष्ट्रात मान्सूनची सुरुवात झाली असून आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने विदर्भातील १६ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पडेल, अशी शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची तीव्रता वाढेल, असा अंदाज आहे.
आज नगर, पुणेसह राज्यातील १६ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
अलर्ट असलेले जिल्हे:
– विदर्भ: बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
– मध्य महाराष्ट्र: नगर, पुणे, सोलापूर
– मराठवाडा: धाराशिव, लातूर
नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर बीड आणि नांदेड जिल्ह्यांत हलक्या सरींचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम