कडबा कुट्टी मशीन साठी ऑनलाइन अर्ज

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १४ नोव्हेंबर २०२२ | शेतकरी बंधुनो तुमच्याकडे गुरे असतील तर त्यांचा चारा पाणी करण्यासाठी कडबा कुट्टी मशीन असणे खूप गरजेचे आहे.
कडबा कुट्टी मशीन फायदे

चारा कापण्यासाठी खूप कमी वेळ लागतो.खूप मोठा चारा अगदी कमी वेळेत कापता येतो.चारा बारीक झाल्याने जनावरांना खाण्यास सोपा जातो.
चाऱ्याची कमी जागेत साठवणूक करता येते.चारा वाया जात नाही, म्हणजे नासाडी कमी होते.

वरीलप्रमाणे कडबा कुट्टी मशीनचे शेतकऱ्यांना खूप फायदे आहेत. हे कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी शासकीय अनुदान योजना आहे. याच संदर्भात आपण या ठिकाणी अगदी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत.
कडबा कुट्टी साठी ऑनलाईन अर्ज.

शासकीय अनुदानावर जर तुम्हाला कडबा कुट्टी मशीन खरेदी करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज खालील पद्धतीने सादर करा.
mahadbt या वेब पोर्टलवर जा.

युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगीन करा.

तुमची नोंदणी झाली नसेल तर नोंदणी करून घ्या.

लॉगीन केल्यावर अर्ज करा असे अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.

 

paid add

मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा.

तपशील या पर्यायाखालील तपशिलामध्ये मनुष्यचलित अवजारे हा पर्याय निवडा.

व्हील ड्राईव्ह प्रकार आणि एच पी श्रेणीमध्ये काही पर्याय निवडायचा नाही.

यंत्र सामग्री अवजारे या पर्यायासाठी फॉरेज ग्रास ॲण्ड स्ट्रा हा पर्याय निवडा.

प्रकल्प खर्च श्रेणी रिकामी सोडा.

सर्वात शेवटी मशीनच्या प्रकारामध्ये Above 3 व upto 3 असे पर्याय दिसेल त्यापैकी एक पर्याय निवडा आणि अर्ज जतन करा या बटनावर क्लिक करा.
अशा पद्धतीने तुम्ही कडबा कुट्टी मशीनसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज करणेसाठी जवळच्या सीएससी, आपले सरकार सेवा केंद्र मध्ये भेट द्या.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम