कृषी सेवक I २८ नोव्हेंबर २०२२ Iगुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. २७) मागील आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक वाढली. त्यामुळे कांदाटोमॅटो, फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची, घेवड्याच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच आवक-जावक कायम असल्याने इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे भाव स्थिर होते.राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून साधारणतः १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या भाजीपाल्याच्या आवकेमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू येथून सुमारे १२ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतून शेवगा २ टेम्पो, कर्नाटक येथून ४ ते ५ टेम्पो कोबी, राजस्थानातून ७ ते ८ टेम्पो गाजर, गुजरात येथून २ ते ३ टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटक येथून २ ते ३ टेम्पो घेवडा, पंजाब, मध्य प्रदेशातून १६ ते १७ टेम्पो मटार, कर्नाटकातून तोतापुरी कैरी १५० टेम्पो, बंगळूर येथून २ टेम्पो आले, मध्य प्रदेशातून लसणाची १० ते १२ ट्रक इतकी आवक झाली.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम