राज्यात ग्रामपंचायतीसाठी शांततेत मतदान ; उद्या मतमोजणी

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १९ डिसेंबर २०२२ I राज्यभरात ग्राम पंचायत सदस्य आणि सरपंच निवडण्यासाठी सात हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (ता. १८) मतदान झाले. राज्यात शांततेत मतदान पार पडल्याचे वृत्त आहे. राज्यात शांततेत मतदान पार पडल्याचे वृत्त आहे.

 

आज झालेल्या मतदानाची मंगळवारी (ता. २०) मतमोजणी होणार असून लगेच निकाल जाहीर करण्यात येणार आहे.राज्यातील ३४ जिल्ह्यांत ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या सात हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये थेट सरपंच निवड असल्यामुळे मोठी चुरस पाहायला मिळाली.

 

तसेच तरुणांचा राजकारणात येण्याचा कल अधिक आहे. सुशिक्षित तरुणांनी ही निवडणुकीच्या प्रक्रियेत हिरिरीने सहभाग नोंदविला आहे. बहुतांश गावांत तरुणांनी जुन्या जाणत्यांसमोर आव्हाने उभी केली. अनेक ठिकाणी राजकीय पक्षांचे प्राबल्य पाहायला मिळत आहे. निवडणुकीत थेट पक्षाचे निवडणूक चिन्ह नसले तरी नेत्यांनी आपले पॅनेल उभे करून प्रत्यक्षपणे प्रचारात सहभाग घेतला.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम