प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २२ नोव्हेंबर २०२२ | प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही केंद्र सरकारची योजना असून यामुळे भारतीय मत्स्यव्यवसायाला नवसंजीवनी मिळणार आहे.या योजनेमुळे हजारो जणांना रोजगार संधी निर्माण होतील तसेच देशाला परकीय चलन देखील प्राप्त होईल. आपल्या महाराष्ट्र राज्याला या योजनेमुळे काय मिळणार आहे हे सविस्तर पाहूया. सदरील योजना २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कार्यान्वित असेल.

योजनेची उद्दिष्टे –

१. आत्मनिर्भर भारत

२. मत्स्य उत्पादन वाढविणे.

३. मत्स्य व्यवसाय निर्यात वाढविणे.

४. देशात रोजगार निर्मिती करणे.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हातून लाभार्थी कडून अर्ज मागविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत विविध घटक अंतर्भूत आहेत याची सविस्तर माहिती मिळविण्याकरिता आपल्या जिल्ह्यातील सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय येथे संपर्क साधावा.

प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नेमण्यात आलेले आहे.
लाभार्थी –

सर्वसाधारण, महिला, अ. जा., अ. ज. प्रवर्ग

अनुदान –

महिला, अ. जा., अ. ज. प्रवर्ग करिता ६०% तर बाकीच्यासाठी ४०% अनुदान

अधिक माहितीकरिता वेबसाईट – www.fishries.maharashtra.gov.in

विशेष बाब –
राज्यातील मासळी उतरण्याच्या ठिकाणी मानधन तत्वावर (कंत्राटी पद्धतीने) काही तरुणाची सागर मित्र म्हणून नियुक्ती होणार.
यामुळे मत्स्य विज्ञान पदवीधर, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र पदवीधरांना रोजगार संधी मिळणार.
फॉर्म कशा भरायचा, काय काय कागदपत्रे लागतील, संपूर्ण प्रक्रिया कशी आहे याबाबत अधिक माहितीकरिता आपल्या जिल्ह्यातील सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय, महाराष्ट्र शासन यांच्याशी संपर्क साधावा.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम