गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने पालेभाज्यांची लागवड कमी झाली होती. यावर्षी अवकाळी पावसामुळे राज्यातील विविध भागात फळभाज्यांचे नुकसान झाले आहे, तसेच पाण्याच्या कमतरतेमुळे शेवग्याच्या बागा जळाल्या आहेत. परिणामी, शेवगा सध्या बाजारात ७० रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. इतर फळभाज्यांचे दरही वाढले आहेत. परंतु, कांदा आणि बटाटा मात्र २० ते ३० रुपयांच्या दरम्यान आहेत. यामुळे गृहिणींना म्हणावे लागत आहे, “कांदा-बटाटा परवडतो, पण शेवग्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल.”
आजचे राशिभविष्य: २५ मे २०२४ साठीचे ज्योतिषीय अंदाज
कांदा-बटाटा तुलनेने स्वस्त
मागील सहा महिन्यांत शेवग्याचे उत्पादन २०% कमी झाले आहे, त्यामुळे राज्यातील बाजारपेठेत शेवगा महाग झाला आहे. परंतु, कांदा आणि बटाटा मात्र तुलनेने स्वस्त आहेत. कांदा निर्यात बंदी उठविल्यानंतर त्याचे दर वाढतील अशी अपेक्षा होती, परंतु कांदा २० रुपयांपेक्षा महाग झालेला नाही. बीड शहरातील बाजारपेठेत कांदा २० ते २५ रुपये किलो दराने विकला जात आहे, तर बटाटा ३० रुपये किलो आहे.
पिक विमा योजना २०२३-२४: शेतकऱ्यांना कमी व अधिक तापमान नुकसानीसाठी दुहेरी लाभ – खासदार रक्षाताई खडसे
पालेभाज्या महाग
उन्हाळ्यामुळे पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. वातावरण बदल, ढगाळ हवामान, उष्णतेचा प्रकोप आणि अवकाळी पावसामुळे पालेभाज्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे.
शेवग्याचे दर पुढील महिन्यात १०० रुपयांवर पोहोचतील असा अंदाज व्यापारी वर्तवत आहेत. यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक भार सहन करावा लागत आहे.
गृहिणींचे म्हणणे
पावसाळ्यात नवीन शेवग्याची आवक वाढेल, तोपर्यंत शेवग्याचे दर वाढलेले राहतील. काळ्या मसाल्यातील शेवगा खाणे सर्वांना आवडते, पण भाव वाढल्याने आता अर्धा किलो ऐवजी २५० ग्रॅम घ्यावा लागत आहे.
– अनिता बांगर, गृहिणी, बीड
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम