कृषी सेवक | ७ नोव्हेंबर २०२२ | ज्येष्ठ हवामान तज्ञ परभणी भूमिपुत्र पंजाबराव डख महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान पंजाबराव डख यांनी नवीनतम हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे. पंजाबराव डख यांच्या मते उद्यापर्यंत राज्यातील सांगली, सातारा, सोलापूर आणि नांदेड या तिन्ही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळणार आहे.
दरम्यान उर्वरित राज्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असून राज्यात थंडीचा जोर वाढू लागला आहे. हवामान अंदाजासोबतच शेतकरी बांधवांसाठी पंजाबराव डख यांनी एक मोलाचा आणि रब्बी हंगामासाठी उपयुक्त असा सल्ला देखील जारी केला आहे. पंजाबराव डख यांनी जारी केलेल्या सल्ल्यानुसार, शेतकरी बांधवांनी थंडीचा जोर वाढल्यानंतर गव्हाची आणि हरभऱ्याची पेरणी करणे त्यांच्यासाठी उपयुक्त राहणार आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम