कृषी सेवक | ४ एप्रिल २०२४ | भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दिलेल्या माहितीप्रमाणे, राज्यावर सध्या हवेची द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे आर्द्रतेचे प्रमाण वाढून शुक्रवारपासून पुन्हा चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. सदर काळात तापमानातही दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढण्याचा अंदाज आहे.
दक्षिण तमिळनाडू ते पूर्व विदर्भापर्यंत हवेच्या खालच्या स्तरात एक द्रोणिका रेषा तयार झाली आहे. ही रेषा कर्नाटक आणि मराठवाड्यावरून जाते. यामुळे पाच ते आठ एप्रिल दरम्यान उत्तर व मध्य महाराष्ट्रात, सहा ते आठ एप्रिल या काळात कोकण, मराठवाड्यात आणि सात ते आठ एप्रिल दरम्यान विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
पुणे आणि परिसरात पुढील पाच दिवस दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. सात आणि आठ तारखेला हलका पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. तर मुंबईत मात्र उकाडा वाढणार आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम