‘या’ आहेत स्ट्रॉबेरीच्या प्रमुख प्रजाती; किती येतो लागवड खर्च?

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ५ एप्रिल २०२४ | महाराष्ट्र राज्यात स्ट्रॉबेरीचे उत्पादन अगदी मोठ्या प्रमाणात घेतले जाते. स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अनुदान दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी महाबळेश्वर येथील कार्यक्रमात म्हटले होते. प्रामुख्याने नाविन्यपूर्ण पीक असेल तर अशा पिकाच्या प्रजाती शेतकऱ्यांना माहिती असणे खूप आवश्यक असते.

शेतकरी सध्याच्या घडीला पॉलीहाउस, हाइड्रोपोनिक्स या आधुनिक पद्धतीने स्ट्रॉबेरी लागवड करू शकतात. परंतु, भांडवलाअभावी काही शेतकऱ्यांना हे शक्य नाही. तर शेतकरी आपल्या पारंपरिक बेड, ठिबक, मलचिंग पेपर पद्धतीने देखील लागवड करू शकतात. शेतकऱ्यांना अशा लागवडीसाठी नेहमीप्रमाणे हेक्टरी अडीच लाखांपर्यंत खर्च येण्याची शक्यता असते. तर शेतकऱ्यांना राज्यात ३५० ते ४०० रुपये प्रति किलो दर हमखास मिळतो.

जाणून घेऊ यात स्ट्रॉबेरीच्या प्रमुख प्रजाती?

1. चांडलर स्ट्रॉबेरी : स्ट्रॉबेरीची प्रजाती प्रामुख्याने मिठाई तयार करण्यासाठी वापरली जाते. या वाणाचे फळ मोठे आणि कडक साल असलेले असतात. या जातीच्या एका फळाचे वजन हे १८ ग्रॅम इतके असते. या प्रजातीचे फळ हे चवीला आणि रंग आकर्षक असते. अशक्तपणा किंवा मग आजारपणात चांडलर स्ट्रॉबेरी खाल्लयास गुणकारी मानली जाते.

2. टियागा स्ट्रॉबेरी : टियागा स्ट्रॉबेरी हे वाण लवकर तोडणीला येते. या वाणाच्या एका फळाचे वजन हे ९ ग्रॅम असते. हे वाण मूळचे कॅलिफोर्नियातील आहे, उष्ण वातावरणात पटापट वाढते. सदर वाणाचे फळ खूप लालसर आणि खूप चवदार असते.

paid add

3. टॉरे स्ट्रॉबेरी : टॉरे स्ट्रॉबेरी या वाणाला मध्यम आकाराचे फळ येते. या वाणाच्या एका फळाचे वजन हे मुख्यतः ६ ग्रॅम इतके असते. हे विविध वाण विविध वातावरणात रोगांना बळी पडत नाही. ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ते विशेष लोकप्रिय आहे.

4. बेलरुबी स्ट्रॉबेरी : बेलरुबी स्ट्रॉबेरी हे वाण अधिक उत्पादन मिळण्यासाठी चांगले मानले जाते. या वाणाच्या फळाचा रंग लाल आणि चमकदार असतो. तसेच या वाणाच्या फळाची चव गोड असते. या वाणाच्या एका फळाचे वजन हे १५ ग्रॅमपर्यंत असते, ज्यामुळे त्यातून अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते.

5. फर्न स्ट्रॉबेरी : इतर स्ट्रॉबेरी वाणाच्या तुलनेत फर्न स्ट्रॉबेरी वाण हे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी योग्य मानले जाते. सदर वाणाचा आकार मध्यम, तर रंग अधिक लालसर असतो. हे वाण आपल्या उत्तम स्वादासाठी, चवीसाठी प्रसिद्ध आहे. या वाणाच्या एका फळाचे वजन हे २५ ग्रॅमपर्यंत असते.

6. सेल्वा स्ट्रॉबेरी : सेल्वा स्ट्रॉबेरी हे वाण सर्वच हंगामामध्ये उपलब्ध होते. या वाणाचा वापर मिठाई निर्मिती व्यवसायामध्ये केला जातो. या वाणाच्या एका फळाचे वजन हे १८ ग्रॅम असते. तसेच या वाणाच्या फळाच्या आकार शंकाकार असतो.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम