गेल्या ३ वर्षांत शेतीकडे वळले साडेपाच कोटी भारतीय

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ४ एप्रिल २०२४ | गेल्या ३ वर्षात किमान ५ कोटी ५८ लाख भारतीय नव्याने शेतीकडे वळले आहेत. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि इंस्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंट यांच्या “इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट २०२४” मध्ये ही माहिती सादर आली आहे.

 

कोविड- १९ वाइरस च्या काळात आणि नंतर देखील शहरी भागातील अनेक जण गावाकडे परतून शेतीकडे वळत आहेत. २०२० मध्ये, कृषी आणि संलग्न क्षेत्रातील कामगारांची संख्या ३ कोटी ८ लाखांनी वाढली. पुढील वर्षी, २०२१ मध्ये कृषी क्षेत्रातील कामगारांमध्ये १ कोटी २१ लाखांची भर पडली. २०२२ मध्ये आणखी १ कोटी २९ लाख नवे शेतकरी शेतीत सामील झाले. २०१९-२०२२ मध्ये कृषी विकासाला चालना मिळाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 

paid add

आलीकडे, मोठ्या संख्येने नागरिकांनी शेतीकडे परतने, हे कदाचित नव्या संकटाचे लक्षण असू शकते, अशी भीती व्यक्त केली गेली आहे. बिगरशेती क्षेत्र रोजगार निर्माण करण्यास सक्षम नसल्यामुळे, लोकांना कृषी क्षेत्राकडे वळावे लागत आहे. त्यात महिलांची संख्या पुरूषांपेक्षा जास्त असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम