राजे यशवंतराव होळकर महामेष योजना

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २४ नोव्हेंबर २०२२ | पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी राबवली जाणारी एक महत्त्वाचे योजना.
म्हणजे राजे यशवंतराव होळकर महामेष योजना याच योजने करिता 2022-23 करिता अर्ज मागविण्यात आले आहे. 15 नोव्हेंबर 2022 पासून 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

या संदर्भातील एक जाहिरात एक प्रसिद्धी पत्र व्यवस्थापकीय संचालक. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी मेंढी विकास महामंडळ यांच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेले आहे.

ज्याच्यामध्ये राज्यातील भटक्या जमाती भजक या प्रवर्गातील 18 ते 60 वयोगटातील अर्जदारांकडून 15 नोव्हेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत. महामेष एप्लीकेशनच्या माध्यमातून फक्त ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

तरी इच्छुक अर्जदारांनी या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत अशा प्रकारचा आव्हान या जाहिरातीच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. 2022-23 मध्ये ही योजना 34 जिल्ह्यामधील 351 तालुक्यांमध्ये राबवली जाणार आहे.

ज्याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं 6 मुख्य घटक आणि त्याच्या अंतर्गत साधारणपणे 15 उपघटक अशी ही योजना राबवली जाते. याच्यामध्ये आपण जर पाहिलं स्थायी आणि स्थलांतरित पालन करणारे मेंढपाळ आहेत.

यांना या ठिकाणी 20 मेंढ्या आणि 1 नर मेंढा अशा प्रकारे 75% टक्के अनुदानावर वाटप केले जातात. याच्यामध्ये आपण जर पाहिलं कायमस्वरूपी एका ठिकाणी राहणारे जे मेंढपाळ असतील.

महामेष अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म

यांना साधारणपणे 2 लाख 49,750 रुपये एवढे अनुदानावरती 20 मेंढ्या आणि एक मेंढ्यांवर दिला जातो. ज्याच्यामध्ये साधारणपणे 8 हजार रुपये मेंढी तर 10 हजार रुपयापर्यंत नर मेंढा अशा प्रकारे प्रकल्प खर्च. एकूण 3 लाख 33 हजार रुपये एवढा प्रकल्प खर्च ग्राह्य धरला जातो.

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम