उन्हाचा चटका वाढल्यामुळे घरातील रोपांचे संरक्षण कसे करावे?

बातमी शेअर करा

राज्यात तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचले आहे, ज्यामुळे नागरिक त्रस्त आहेत आणि घरातील रोपांच्याही संरक्षणाची आवश्यकता आहे. तुमच्या झाडांना कडक उन्हापासून कसे वाचवाल? जाणून घ्या…

प्रखर सूर्यप्रकाश आणि उच्च तापमानामुळे रोपे सुकतात किंवा करपतात. त्यामुळे बाग निरोगी ठेवण्यासाठी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

टोमॅटो मार्केट: स्थानिक टोमॅटोचे सर्वाधिक दर, आज कोणत्या बाजारात किती दर मिळाले, वाचा सविस्तर

हवामान समजून घ्या

तुमच्या बागेची निरोगी वाढ होण्यासाठी हवामान समजून घेणे आवश्यक आहे. आपल्या परिसरातील रोजचे तापमान किती आहे, हे जाणून घ्या. तापमान ४० अंशांच्या वर गेल्यास, रोपांना प्रखर सूर्यप्रकाशापासून वाचवण्यासाठी काही काळाने त्यांच्या जागा बदलणे किंवा हिरवे कापड वापरणे फायदेशीर ठरते.

योग्य रोपे निवडा

सर्व रोपांना पूर्ण सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते. जास्वंद आणि परीविंकल यांसारखी काही रोपे सूर्यप्रकाशात चांगली वाढतात. सावलीत चांगली वाढणारी रोपे देखील निवडता येतात.

जमिनीत ओलावा ठेवा

जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि तणांची वाढ रोखण्यासाठी सेंद्रिय आच्छादनाचा जाड थर लावा. मल्चिंगमुळे मातीचे तापमान नियंत्रित राहते आणि रोपांची मुळे थंड राहतात.

सावलीचा पर्याय

प्रखर उन्हात वनस्पतींना सावली देणे आवश्यक आहे. जुन्या चादरी, खिडकीचे पडदे किंवा लाकडी जाळीचे पटल यांचा वापर करून रोपांना सावली देता येते.

IMD Weather Update : पूर्व विदर्भातील ४ जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा इशारा, ५ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा अलर्ट

मातीचा पोत सुधारणे

मातीचा पोत सुधारण्यासाठी नियमित उकरा आणि सेंद्रिय पदार्थांचा वापर करा. यामुळे मातीची पाणी धारणा क्षमता वाढते.

छाटणी करायला विसरू नका

रोपांची छाटणी केल्यास त्यांची वाढ सुधारते. मृत किंवा रोगट पाने काढून टाका आणि बुरशीजन्य रोग टाळण्यासाठी फांद्यांची छाटणी करा.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम