कृषी सेवक | ५ नोव्हेंबर २०२२ | हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी 4 नोव्हेंबर रोजी पलवलमध्ये अत्याधुनिक ‘धानुका अॅग्रीटेक रिसर्च अँड टेक्नॉलॉजी सेंटर’ (DART) चे उद्घाटन केले. पलवल, हरियाणात सुमारे साडेसहा एकर (6.24 एकर) मध्ये पसरलेले हे संशोधन आणि विकास केंद्र 10 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने तयार करण्यात आले आहे. ते शेतकरी, संशोधक आणि इतर भागधारकांना संशोधन इत्यादींमध्ये वापरण्यासाठी उपलब्ध असेल.यावेळी मुख्यमंत्र्यांसह भारत सरकारचे ऊर्जा व अवजड उद्योग राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर, स्थानिक आमदार दीपक मंगला, चौधरी चरणसिंग कृषी विद्यापीठ, हरियाणाचे कुलगुरू डॉ.(प्रा.) बी. . आर. कंबोज आणि महाराणा प्रताप उद्यानविद्या विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. समर सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम