कृषी सेवक | १४ नोव्हेंबर २०२२ | संजय गांधी निराधार योजना शासनाकडून सुरु असून या योजनेचा लाभ कोणाला घेता येईल याविषयी माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत .
पात्रतेचे निकष,अटी,शर्ती
वय
65 वर्षापेक्षा कमी असावे.
कुटुंबाचे उत्पन्न
प्रतिवर्षी रुपये – 21000/- पर्यंत.
आर्थिक सहाय
एक व्यक्ती निराधार कुटुंबाला प्रतिमाह रुपये 600/-, एकापेक्षा जास्त लाभार्थी कुटुंबाला रुपये 900/- प्रतिमाह या मर्यादेत.
पात्रतेची अर्हता
अपंग, दुर्धर आजार, निराधार स्त्री/पुरष, विधवा,घटस्फोटित,अनाथ मुले,परीत्यक्ता आत्महत्या केलेल्या शेतक-याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न या योजनेखालील विहीत उत्पन्नापेक्षा कमी असल्यास ते कुटुंब.
वयाचा दाखला
ग्रामपंचायत,नगरपालीका/महानगरपालीकेच्या जन्मनोंद वहीतील उता-याची साक्षांकीत प्रत किंवा शाळा सोडल्याचा दाखला शिधापत्रिकेमध्ये अथवा निवडणुक मतदार यादीत नमुद केलेल्या वयाचा उतारा किंवा ग्रामिण/नागरी रुग्णालयाच्या वैदयकीय अधिका-याने दिलेला वयाचा दाखला.
उत्पन्नाचा दाखला
तहसिलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेला दाखला किंवा दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये त्या व्यक्ती/ कुटुंबाचा समावेश असल्याबददलचा साक्षांकीत उतारा.
इतर अटी
रहिवासी दाखला, अपंगाचे प्रमाणपत्र,असमर्थतेचा/रोगाचा दाखला,अनाथ असल्याचा दाखला.
अर्ज सादर कुठे करावा
अर्ज तहसील कार्यालयास सादर करावा.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम