कृषी सेवक I २१ डिसेंबर २०२२ I आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंड दरात चढ उतार कायम आहेत. दर देशातील बाजारभाव टिकून आहेत.
आज देशात सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये दर मिळला. तर प्रक्रिया प्लांट्सचे दर ५ हजार ६०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होते. तसंच देशातून सोयापेंड निर्यात वाढत आहे. त्यामुळं सोयाबीन बाजाराला आधार मिळतोय. तर पुढील महिन्यात सोयाबीन दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम