कृषी सेवक I १७ डिसेंबर २०२२ I आंतरराष्ट्रीय बाजारात आजही सोयाबीनच्या दरात चढ उतार होते. आज सोयाबीनचे वायदे १४.७१ डाॅलर प्रतिबुशेल्सवर स्थिरावले. देशातील सोयाबीन बाजार मात्र आजही काहीसा स्थिर होता. आज सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. आंतरराष्ट्रीय खाद्यतेल बाजारात पुढील काही दिवसांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सोयाबीनच्या दरातही मर्यादीत सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम