कृषी सेवक | १८ मे २०२४ | कृषी सेवक | १८ मे २०२४ | नेपाळ सरकारने भारतीय मसाल्यांवर बंदी घातलेली आहे. भारतीय मसाले त्यांच्या चवीमुळे आणि औषधी गुणधर्मामुळे जगभर प्रसिद्ध आहेत आणि अनेक देशांमध्ये निर्यात होतात.
भारतीय मसाल्यात ‘एथिलिन ऑक्साइड’चे प्रमाण अधिक आढळल्यामुळे नेपाळने भारतातील एव्हरेस्ट आणि एमडीएच या दोन लोकप्रिय ब्रँड्सवर बंदी घातली आहे.
राज्यातील ‘या’ भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता; आयएमडीचा इशारा
सिंगापूर, हाँगकाँग आणि न्यूझीलंड या देशांनीही यापूर्वी या मसाल्यांवर बंदी घातली आहे, ज्यामुळे भारतातील मसाला निर्यातदार कंपन्या अडचणीत आल्या आहेत आणि निर्यात ५% ने घटली आहे.
मसाले दीर्घकाळ टिकावेत म्हणून स्टरलायझेशन प्रक्रियेत एव्हरेस्ट आणि एमडीएच मसाल्यांमध्ये एथिलिन ऑक्साइडचे प्रमाण जास्त आढळल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.
‘फेडरेशन ऑफ इंडियन स्पाइस स्टेक होल्डर्स’चे चेअरमन अश्विन नायक यांनी सांगितले की, भारतातून दरवर्षी चार अब्ज डॉलरचे मसाले निर्यात होतात. मसाले सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व देशांत एथिलिन ऑक्साइडचा वापर केला जातो, परंतु त्याचे प्रमाण वेगवेगळे असते.
ब्रिटनमध्ये अतिरिक्त सतर्कता
ब्रिटनच्या फूड स्टँडर्ड ऑथॉरिटीने भारतीय मसाल्यांची तपासणी वाढवली आहे. सर्व भारतीय मसाल्यांची आता कीटकनाशक अंश चाचणी केली जाईल.
कापूस बियाणे खरेदी करताना सावध – कृषी विभागाचा शेतकऱ्यांना इशारा !
कॅन्सरचा धोका?
नेपाळच्या अन्न तंत्रज्ञान व गुणवत्ता नियंत्रण विभागाचे प्रवक्ते मोहन कृष्ण महाराजन यांनी सांगितले की, एथिलिन ऑक्साइडमुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे नेपाळने एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांच्या आयातीवर सात दिवसांची बंदी घातली आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम